जिल्ह्यात मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन

 

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा निवडणूक कार्यालयाने जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विविध कामांसाठी ३ हजार ७५९ वाहनांचे नियोजन केले आहे. यामध्ये बस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, ऑटोरिक्षा आदी विविध वाहनांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे नियोजन सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार ८९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या माध्यमातून त्या त्या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाच्या अनुषंगाने आवश्यक साहित्य, मतदार जनजागृती साहित्य, ईव्हीएम मशीन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी वाहने, भरारी पथकांसाठी वाहने आदी वाहनांचे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वाहतूक व्यवस्था पथकाच्या माध्यमातून नियोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *