मुलुंड मराठा मंडळ या ज्ञाती संस्थेचे कार्य समाजाला दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी आहे – मेजर डॉ. आश्लेषा तावडे -केळकर

 

ठाणे : सुप्रसिध्द लेखक, संपादक अशोक राजाराम तावडे संपादित आश्लेषा या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच १६ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या मंगल दिवशी मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेच्या चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना मेजर डॉ. आश्लेषा तावडे – केळकर यानी मराठा मंडळाच्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून आश्लेषा दिवाळी अंकाची जन्मकथा आणि पहिल्या अंकाच्या प्रकाशनाचा हृदयस्पर्शी आढावा घेतला. या अंकाचे संपादक अशोक तावडे यानी भारतीय लष्कर सेवेतून मेजर म्हणून निवृत्त झालेल्या आपल्या कर्तबगार कन्येचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून आश्लेषा हे आपल्या कन्येचेच नाव या अंकाला ठेवण्याची आठवण सांगितली.
मुलुंड मराठा मंडळाचे ज्येष्ठ सभासद अशोक तावडे  यांनी मराठा मंडळाच्या ४६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा प्रकाशन सोहळा घडवून आणला. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्याबरोबरच अशोक तावडे, मेजर डॉ. आश्लेषा तावडे-केळकर मंडळाचे उपाध्यक्ष अरुण चव्हाण, शिवाजी सावंत, कार्याध्यक्ष महेश चव्हाण, सरचिटणीस अजय खामकर, वाचनालय / अभ्यासिका विभाग प्रमुख मिनल सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या संदर्भात सुप्रसिध्द वृत्तपत्र पत्रलेखक सूर्यकांत भोसले, मंडळातील एक सेवाभावी सेवक सुंदरराज पिल्ले यांच्याबरोबरच मंडळाच्या कर्तबगार महिला कार्यकर्त्या माधुरी तळेकर, रश्मी राणे, ऐश्वर्या ब्रीद व मिनल सावंत यांचाही मेजर डॉ. आश्लेषा तावडे यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *