पहिल्या यादीत फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट ० ८८ आमदारांना पुन्हा संधी ० ११ नवे चेहरे० मुंबईच्या भारती लव्हेकर, पराग शहा, सुनील राणेंचे टेन्शन वाढले०
स्वाती घोसाळकर
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवार घोषित करण्यामध्ये भाजपाने बाजी मारली आहे. भाजपाने आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून लवकरच दुसरी यादीही जाहिर करण्यात येणार आहे. भाजपाच्या या नाबाद ९९ यादीत विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विद्यामान प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंसह तब्बल ८८ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. तर ११ नवे चेहरे या निवडणूकीत उतरवेल आहेत. पण मुंबईतील भारती लव्हेकर, पराग शहा आणि सुनील राणे या आमदारांचा पहिल्या यादीत समावेश नसल्याने त्यांचे टेन्शन वाढले आहे. भाजपच्या यादीत मुंबईतले १४ तर ठाण्याचे ८ उमेदवार जाहीर झाले आहेत.
दरम्यान या पहिल्या यादीत खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. भोकरमधून अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण, भोकरदनमधून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे, तर मालाड पश्चिममधून आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश होता.
भाजपच्या यादीत मुंबईतले 14 उमेदवार जाहीर झाले आहेत.
चिंचवडमधून विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या जागी त्यांचे दीर शंकर जगतापांना उमेदवारी मिळाली आहे. बोरिवली जागेवर विद्यामान आमदार सुनील राणेंच्या जागेवर गोपाळ शेट्टीही इच्छुक, त्यामुळे नाव घोषित झालेलं नाही. कामठीतून टेकचंद सावरकरांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईत भारती लव्हेकर, पराग शाह, सुनील राणेंच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. महत्वाचं म्हणजे ठाणे मतदारसंघ भाजपकडेच राहिलाय.आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.
तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे.
