दोन्ही घरातील कुटुंबातील सदस्य जखमी

 

सोयगाव : बनोटी मंडळात झालेल्या शनिवारी रात्रीच्या अतिवृष्टी मुळे  दोन घरे कोसळून त्यामध्ये दोन कुटुंबातील पाच जण दबल्याची घटना  सोयगाव तालुक्यातील कींन्ही येथे शनिवारी रात्रीला एक वाजता घडली ह्या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसुन दोन्ही कुटुंबातील सदस्य  कीरकोळ जखमी झाले आहेत…महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे जखमीना उपचार करून रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी सोडण्यात आले आहे
कीन्हीसह परीसरात गेल्या पाच  दीवसापासुन परतीच्या पावसाने थैमान घातले असुन ढगफुटी दुश्य मुसळधार पाऊस होत असल्याने नदीनाल्यांना मोठा पूर येत आहे शुक्रवार व शनिवार रात्री आठ वाजेनंतर वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये कींन्ही येथील गौतम शंकर शेळके हे पत्नी ,आई,दोन मुलांसह घरात झोपलेले होते तसेच कैलास ओंकार लोखंडे हे देखील पत्नी व दोन मुलांसह झोपलेले असताना पावसामुळे मध्यरात्रीला जवळजवळ असलेले दोघे घराच्या भिंती पडल्याने घरे कोसळली त्यामध्ये दोघे कुटुंबातील पाच सदस्य दबले मोठा आवाज आल्याने आजुबाजुचे रहीवाशी सरपंच छबाबाई फलके,कीशोर फलके,पप्पु देशमुख, वाल्मीक शेळके,वामन शेळके,शेनपडु थोरात आदींनी त्या कुटुंबातील सदस्याना बाहेर काढले व तातडीने उपचार साठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते यामध्ये प्रशिक गौतम शेळके(वय १३) ,पलक शेळके (वय १७) आणि छबाबाई शंकर शेळके(वय ६८) यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून हे तिघेही झोपलेल्या अवस्थेत दबले यामध्ये ते जखमी झाले आहे त्यांचेवर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना रविवारी सायंकाळी सहा वाजता घरी आणले आहे दरम्यान एकाच गावात दोन घरे पडल्याने संसार उपयोगी साहीत्याचे पुर्ण नुकसान झाले आहे हे गोरगरीब कुटुंब उघड्यावर आले आहे परंतु सुदैवाने ह्या घटनेत कुढल्याही जीवीतहानी झाली नाही तरी प्रशासनने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *