रमेश औताडे
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक भाषणातील विविध पैलूंची विषयावर रचना असलेले ” थॉटस् ऑफ आंबेडकर ” या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी मुंबई प्रेस क्लब येथे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अर्जुन डांगळे  यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना नामदेव साबळे म्हणाले, हे पुस्तक आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव आणि भारतीय घटनेचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संकलन आहे. बाबासाहेबांचे क्रांतीकारी परिवर्तनवादी विचार हे भारतातल्या शोषित, पिडीत पददलित लोक समुहाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय लढ्यांना ऊर्जा नि प्रेरणा देणारे विचार आहेत.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारा शिवाय इथला सर्वहारा वर्ग त्याच्या मनुवादी बामन, बनिया शोषकाविरुद्ध, शोषकांच्या शासनाविरुद्ध आणि या शोषकांचं रक्षण करणाऱ्या समाज व धर्मव्यवस्थेविरुद्ध सर्वंकष निर्णायक लढा उभारू शकत नाही असे नामदेव साबळे म्हणाले.
यावेळी दलित पॅंथर एनएलडी चे केंद्रीय अध्यक्ष सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, राजकीय विश्लेषक सुनील कदम, दैनिक सार्वभौम राष्ट्र चे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक साहित्यिक विचारवंत राजू रोटे तर सूत्रसंचालन केतकी प्रकाशन कार्यकारी संपादक पंकज चाळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *