ग्रामस्थांमध्ये जल्लोष
सोयगाव : वहातूक निरीक्षक अशोक काकडे यांनी रविवारी (दि २०) बनोटी (ता.सोयगांव) येथील बसस्थानकाची पहाणी करून हिरवा कंदिल दिल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेली लालपरि गावात येणार असल्याने ग्रामस्थांत आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
तीन वर्षापूर्वी बनोटी येथील हिवरा नदिला आलेल्या महापुरात नदि वरील पुलासह एस. टी बसस्थानक वाहुन गेल्याने बस दोन किलोमीटर गावाबाहेरुन जात असल्याने महिला, विद्यार्थी, वृद्धांचे अतोनात हाल होत असल्याने बनोटी ग्रामपंचायतीने शासकीय अनुदानाची वाट न बघता बसस्थानकाचे काम हाती घेऊन पूर्ण झाल्याने सोयगाव, सिल्लोड, पाचोरा आगारास ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन बसेस पुर्वरत चालु करण्याची मागणी केल्यावर सोयगाव आगाराचे वहातूक निरीक्षक अशोक काकडे यांनी शनिवारी बनोटी बसस्थानकाची पहाणी करीत बसेस पुर्वरत करण्याचे सांगितल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत आगार प्रमुख, चालक मनोज चव्हाण, वाहक रवि सोनवणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच उदय खैरनार, वामन जाधव, निळकंठ खैरनार, साहेबराव वेहळे, संतोष खैरनार, नामदेव चव्हाण, छोटूराम पाटील, योगेश निकम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0000
