कर्जत : अशोक गायकवाड
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जन जागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर सभेत नामनिर्देशन पत्रे भरणे बाबत कार्यपद्धती, आचारसंहिता, निवडणूक खर्च याबाबत विस्तृत माहिती देणेत आली. तसेच नामनिर्देशन पत्रे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तहसीलदार यांचे दालन पहिला मजला येथे स्विकारली जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कर्जत प्रकाश संकपाळ यांनी दिली आहे. यावेळी कर्जत पोलिस उपविभागीय अधिकारी डी.डी. टेळे, कर्जत तहसीलदार धनंजय जाधव, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा अपर तहसीलदार कर्जत श्रीमती दुर्गा देवरे व विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण ३६२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीया पार पडण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादी नुसार कर्जत विधानसभा मतदार संघात एकुण ३ लाख १३ हजार ८८४ मतदार भाग घेणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख ५७ हजार २१८, स्त्री मतदार १ लाख ५६ हजार ६६१, तर ५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जन जागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश संकपाळ यांनी मतदार संघात आचार संहितेचा भंग होणार नाही या साठी सर्व यंत्रणाच्या बैठका घेऊन करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देशीत केले आहे. निवडणुक प्रक्रिया सुलभ व कायदा, सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता पार पाडण्याच्या दृष्टीने विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे तसेच मतदार संघाच्या सिमांवर चेक पोष्ट ची उभारणी करण्यात आली आहे तसेच २४ टोल फ्री क्रमांक १९५० कार्यान्वीत करण्यात आला आहे. १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून नामनिर्देशनप्रत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय भवन कर्जत येथे स्विकारण्यात येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी कर्जत प्रकाश संकपाळ यांनी कळविले आहे.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *