न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचालित न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत वाचन प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ मी वाचले, तुम्हीही वाचा’ या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनही पार पडले. साटेलकरसर यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य विशद केले. मुख्याध्यापक जी बी परब सर यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. इयत्ता सहावी टे दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. सुयश सद्गुरू साटेलकर (रडार सिस्टीम – प्रथम क्रमांक), कौशल माधवराव भोसले आणि विक्रम वसंत भूतकडे (रिचार्जेबल टेबल फॅन- द्वितीय क्रमांक), कुंदन धनंजय नाटेकर ( स्मार्ट होम )आणि तेजस निलेश शेट्ये (ग्रास कटर) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. शालेय समिती अध्यक्ष निलिमा सावंत, सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. कदम मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
0000
माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीची निवड चाचणी २३ ऑक्टोबरला
मुंबई : माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने १३ ते १९ या वयोगटातील मुलांसाठी बुधवार, २३ ऑक्टोबरला दुपारी ३ ते ६ या वेळेत निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून १ सप्टेंबर २००५ ते ३१ ऑगस्ट २०१२ या दरम्यानच्या काळात जन्मलेली मुले या चाचणीसाठी पात्र ठरतील. इच्छुक मुलांनी वरील दिवशी क्रिकेट किट, क्रिकेटचा पांढरा गणवेश आणि जन्माच्या दाखल्यासह माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी अमित जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८६५५३३७८८५ किंवा ७०२११४७४७५ येथे संपर्क साधावा.
