राजेंद्र साळसकर

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या अध्यक्षपदी आमदार सचिनभाऊ अहिर,तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते या नेतृत्वाची फेरनिवड झाली आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पंचवार्षिक नवनियुक्त संयुक्त प्रतिनिधी मंडळाची सभा मनोहर‌ फाळके सभागृहात पार पडली. या सभेत एकमुखी ठरावाद्वारे अध्यक्ष व सरचिटणीसपदाची घटनेप्रमाणे आणि लोकशाहीप्रणालीनुसार निवडणूक पार पडली.

मुंबईत आज आपले अस्तित्व टिकवून असलेल्या (१)टाटा (२)इं.यु.मि.क्र.५,(३)पोद्दार (४)दिग्विजय आणि (५ ) न्यू ग्रेट या गिरण्यांतील कामगारांमधून प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सभेत स्विकृत सदस्यांची निवड केली. निवडून आलेल्यांमध्ये‌‌ महिला प्रतिनिधींचाही समावेश आहे.

निवडून आलेले प्रतिनिधी आणि ‌स्विकृत सदस्य यांच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाची सभा मनोहर फाळके सभागृहात पार पडली.या सभेत वरील प्रमाणे संघटना नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात आला होता. निवडणूक प्रमुख‌ म्हणून बजरंग चव्हाण यांनी काम पाहिले.

सभेला निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, शिवाजी काळे या माजी पदाधिका-यांची सदस्य म्हणून निवड झाली.नव्या  पदाधिकाऱ्यांच्या  निवडीचे अधिकार अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना सभेत ठरावाद्वारे‌ देण्यात आले होते. लवकरच‌ पदाधिकाऱ्यांची‌‌ निवड रितसर जाहीर करण्यात येईल.

नवनियू्क्त अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी सर्व नवनियुक्त प्रतिनिधींचे स्वागत करताना म्हटले‌ आहे, लोकशाहीची थोर परंपरा लाभलेल्या देशाच्या निवडणुकी पासून कामगार चळवळीतील कामगार संघटनांच्या संघटनात्मक निवडणुकीच्या इतिहासाची जेव्हा – जेव्हा चर्चा होईल, तेव्हा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले असेल.सन १९९६-९७ पासूनच्या गेल्या २८ वर्षांच्या आपल्या यशस्वी कारकीर्दीचा उल्लेख करून,सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, केंद्र‌सरकारने चार संसदीय विधेयके संमत केली.त्यामुळे कामगार चळवळीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचेही त्यावेळी भाषण झाले. आभार बजरंग चव्हाण यांनी मानले.

ठरावाना‌ अनुमोदन प्रतिनिधी दीपक राणे,नामदेव झेंडे, सुभाष नारकर‌ यांनी केले.महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन‌ लाड, सुनिल अहिर यांनी नव्या नेतृत्वाचे पूष्पगुच्छाने स्वागत केले.राष्ट्रीय‌ मिल‌ मजदूर संघाच्या नव‌नियुक्त नेतृत्वाचे गिरण‌गावात जोरदार स्वागत होत आहे،

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *