स्वाती घोसाळकर
मुंबई : आणखिन एक ठाकरे अखेर निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहिम विधानसभा मतदार संघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे निवडणूक लढविणार आहे. विशेष म्हणजे मनसेने आज जाहिर केलेल्या यादीत वरळीतून संदीप देशपांडे यांची उमेदवारीही जाहिर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण आदित्य मागील २०१९ च्या निवडणूकीत जेव्हा वरळीतून उभा राहीला होता तेव्हा मनसेने त्याच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. यंदाही अमितच्या विरोधात उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार दिल्याने उद्धव ठाकरेंवर दबाव ठाकण्यासाठी तर ही खेळी केली नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.
दरम्यान काही दिवसांपुर्वीच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. या बैठकीत अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे कळते. माहीम मतदार संघातून सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे आमदार आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्याएवेजी त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच मतदार संघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विभागप्रमुख महेश सावंतही इच्छूक आहे. लढत तिंरगी झाल्यास त्याचा फटका अमित ठाकरेंना बसू शकतो. त्यामुळेच अमितच्या विरोधात उमेदवार उभा करू नये अशी चर्चा झाल्याचे कळते. असे झाल्यास अमित ठाकरे विरुध्द महेश सावंत अशी थेट लढत असेल. किंवा एनवेळी संदीप देशपांडे हे वरळीतून आणि महेश सावंत हे माहीममधून अनुक्रमे आदित्य आणि अमित ठाकरेंसाठी माघार घेतील अशीही चर्चा आहे.
दरम्यान अविनाश जाधव आणि राजू पाटील यांची उमेदवारी राज ठाकरेंनी सोमवारी जाहीर केली होती. त्यानंतर लवकरच दुसरी यादी येईल असं त्यांनी सांगितलं होतं. ज्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत.
विधानसभेसाठी मनसेची यादी पुढीलप्रमाणे –
१) राजू पाटील- कल्याण पाटील
२) अमित ठाकरे -माहीम
३) शिरीष सावंत-भांडुप
४) संदीप देशपांडे-वरळी
५) अविनाश जाधव-ठाणे शहर
६) संगिता चेंदवणकर -मुरबाड
७) किशोर शिंदे- कोथरुड
८) साईनाथ बाबर-हडपसर
९) मयुरेश वांजळे- खडकवासला
१०) प्रदीप कदम-मागाठाणे
११) कुणाल माईणकर-बोरीवली
१२) राजेश येरुणकर-दहिसर
१३) भास्कर परब-दिंडोशी
१४) संदेश देसाई-वर्सोवा
१५) महेश फरकासे-कांदिवली पूर्व
१६) वीरेंद्र जाधव -गोरेगांव
१७) दिनेश साळवी-चारकोप
१८) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
१९) विश्वजीत ढोलम-विक्रोळी
२०) गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम
२१) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
२२) माऊली थोरवे-चेंबूर
२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
२४) निलेश बाणखेले-ऐरोली
२५) गजानन काळे-बेलापूर
२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा
२७) विनोद मोरे- नालासोपारा
२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
२९) संदीप राणे – मिरा भाईंदर
३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली
३२) प्रमोद गांधी-गुहागर
३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड
३४) कैलास दरेकर-आष्टी
३५) मयुरी म्हस्के-गेवराई
३६) शिवकुमार नगराळे-औसा
३७) अनुज पाटील-जळगाव
३८) प्रवीण सूर- वरोरा
३९) रोहन निर्मळ- कागल
४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ
४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण (
४२) संजय शेळके-श्रीगोंदा
४३) विजयराम किनकर-हिंगणा
४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर
