एसएसटी महाविद्यालयाचा दुहेरी विजय
उल्हासनगर : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद,ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये एसएसटी महाविद्यालयाने आपला दबदबा सिद्ध करत दुहेरी मुकुट मिळवला आहे.
स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात एसएसटी महाविद्यालयाच्या संघाने अप्रतिम खेळ दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, १९ वर्षाखालील मुलींच्या गटातही उत्कृष्ट प्रदर्शन करत एसएसटी महाविद्यालयाच्या मुलींनी प्रथम क्रमांकावर आपली मोहर उमटवली. या दुहेरी विजयामुळे एसएसटी महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत असून, महाविद्यालयाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.
तसेच या विजयाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वय डॉ.खुशबू पुरस्वानी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांना विभागीय स्पर्धांसाठी शुभेच्छा ही दिल्या.
