मुंबई : पालिकेने गेल्या पाच दिवसांत रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात एकूण २५० किलो फटाके जप्त केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला.
दिवाळीनिमित्त मुंबईत ठिकठिकाणी फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यापैकी विनापरवाना फटाके विक्री करण्याऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या अनुज्ञापन खात्याच्या पथकाने २५ ते २९ ऑक्टोबर दरम्यान अचानक छापा टाकून संबंधित विक्रेत्यांकडून २२९ किलो फटाके जप्त केले. परळ, अंधेरी (पश्चिम), कांदिवली, मुलुंड , कुर्ला, अंधेरी (पूर्व) , वरळी आदी भागात कारवाई करण्यात आली.
शहर व उपनगरातील २४ पैकी १७ विभागांत पालिकेच्या पथकाने अचानक धाडी टाकून विनापरवानगी फटाक्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडील फटाके जप्त करण्यात आले. मात्र मुंबईत अजूनही गल्लोगल्ली फटाक्यांची दुकाने दृष्टीस पडत आहेत. २५ ते २९ ऑक्टोबर कालावधीत अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम, प्रभादेवी परिसरातून सर्वाधिक विनापरवाना फटाके जप्त करण्यात आले.
0000