जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील चार मतदारसंघात पार पडली
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाकरिता लागणारी मतदान यंत्रे मतदानाकरिता तयार करण्याची प्रक्रिया (EVM Machine Commissioning) ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात आजपासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी समक्ष होत असून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शीपणे होत आहे.
सोमवार 11 नोव्हेंबर रोजी 136 भिवंडी (पश्चिम), 144 कल्याण ग्रामीण, 146 ओवळा माजिवडा व 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात मतदानाकरिता लागणारी मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया (EVM Machine Commissioning) पार पडली.
136 भिवंडी (पश्चिम) विधानसभा मतदार संघ मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया पार पडली. 136 भिवंडी (पश्चिम) विधानसभा मतदार संघात एकुण 303 मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 1 मशिन आणि मतदान केंद्राच्या 20% राखीव या प्रमाणात अतिरिक्त मशीन असे एकूण बॅलट युनिट BU-363, कंट्रोल युनिट CU-363 व VVPAT 393 मतदान यंत्रांची सिलिंगची कार्यवाही सुरु करण्यात आली. याकामी 135 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, एकूण 363 मतदान यंत्रांच्या 5% या प्रमाणात एकूण 18 मतदान यंत्रे मॉकपोलसाठी सुनिश्चित करण्यात आली. ही यंत्रे निश्चित करताना निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी चिठ्या टाकल्या, तर उमेदवार/उमेदवारांचे प्रतिनीधी यांनी चिठ्या उचलून ही 18 मतदान यंत्रे निश्चित केली. सिलींग व मॉकपोल नंतर ही यंत्रे स्ट्रॉगरुम येथे सुरक्षीतरित्या ठेवण्यात आली आहे.
144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाची प्रक्रिया (EVM Commissioning) सावित्रीबाई फुले कलामंदिर, तळ मजला, डोंबिवली (पूर्व) येथे आज पार पडली. 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात 433 + 1 (Auxiliary) अशी एकूण 434 मतदान केंद्रे आहेत. प्रथम निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर चिठ्ठ्या टाकून एकूण मतदान केंद्रांच्या 5 % म्हणजेच एकूण 22 EVM ची निवड करण्यात आली. या EVM मध्ये प्रत्येकी 1 हजार मतांसाठी अभिरुप मतदानाची (मॉक पोल) प्रक्रिया सुरु करण्यात आली. 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील 434 मतदान केंद्रांमध्ये संपन्न होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी 520 कंट्रोल युनिट (CU) व 520 बॅलट युनिट (BU) आणि 564 VVPAT यंत्रे मतदानासाठी तयार करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाची प्रक्रिया न्यू होरायझॉन स्कूल आनंदनगर येथे पार पडली. 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात 487 + 11 (Auxiliary) अशी एकूण 498 मतदान केंद्रे आहेत. आज प्रथम निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर चिठ्ठ्या टाकून एकूण मतदान केंद्रांच्या 5% म्हणजेच एकूण 25 EVM ची निवड करण्यात आली. या EVM मध्ये प्रत्येकी 1 हजार मतांसाठी अभिरुप मतदानाची (मॉक पोल) प्रक्रिया सुरु करण्यात आली. 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील 487 + 11 = 498 मतदान केंद्रांमध्ये संपन्न होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी 548 कंट्रोल युनिट व 548 बॅलट युनिट आणि 647 व्हीव्हीपॅट यंत्रे मतदानासाठी तयार करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
149-मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघाच्या मतदानासाठी लागणारी मतदान यंत्रे मतदानाकरीता तयार करण्याची प्रक्रिया (EVM Commissioning) श्री.मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुल कौसा मुंब्रा येथे करण्यात आली. 149-मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघात 409 + 10 (Auxiliary) अशी एकूण 419 मतदान केंद्रे आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर चिठ्ठ्या टाकून एकूण मतदान केंद्रांच्या 5% म्हणजेच एकूण 25 EVM ची निवड करण्यात आली. या EVM मध्ये प्रत्येकी 1 हजार मतांसाठी अभिरुप मतदानाची (मॉक पोल) प्रक्रिया घेण्यात आली. 149-मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघातील 409 + 10 = 419 मतदान केंद्रांमध्ये संपन्न होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी 502 CU व 502 BU आणि 544 VVPAT यंत्रे मतदानासाठी तयार करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
