अनिल ठाणेकर

ठाणे : आपण महायुतीमधून लढतो आहोत, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचे आहे. वेळ बदल घडविण्याची आहे. मतदारसंघातील वेळ बदलायची आहे, चांगली वेळ आणायची असेल तर नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा, असे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केले.तर क्लस्टर डेव्हलपमेंट-रीडेव्हलपमेंट होणार, सुसज्ज रस्ते करणार, कळवा, खारीगाव, पारसिक नगर परिसराचा विकास करणार असे आश्वासन मतदारांना १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी दिले. नजीब मुल्ला यांची प्रचार सभा खारेगाव येथील जय भारत स्पोर्ट्स क्लब च्या पटांगणात आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विभागप्रमुख शाम पाटील,  शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक उमेश पाटील, मनोज लासे,विजया लासे,अनिता गौरी, गणेश कांबळे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, शिवसेना पदाधिकारी राकेश पाटील, रचना पाटील, सुनील पाटील, सुनील गौरी आदी पदाधिकारी तसेच मोठ्यासंख्येने मतदार उपस्थित होते.

नजीब मुल्ला यांच्या रुपाने एक आश्वासक चेहरा मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून महायुतीने दिलेला आहे. ठाणे महापालिकेतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.मतदारांनी लोकप्रतिनिधी निवडून देताना खासदार, आमदार, नगरसेवक यांची कामे काय असतात ते जाणून घ्यायला हवीत. खासदार म्हणून मतदारसंघातील सेंट्रल रेल्वेत सर्वात जास्त कामे झाली आहेत, पाचवी सहावी रेल्वे लाईन चा प्रश्न मार्गी लागला आहे. इथला आमदार गेली १५ वर्ष नगरसेवकाची कामे आपल्या नावावर खपवत असतो. सक्षम पर्याय नसल्यामुळे आपण त्याला निवडून देत आलोत. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारा, रडगाणे गाणारा आमदार नको तर आपल्याला आपली कामे करणारा,  सभागृहात आपले प्रश्न मार्गी लावणारा आमदार हवा, पण आता नजीब मुल्ला यांच्या रुपाने डॅशिंग, तरुण, अभ्यासू उमेदवार पर्याय म्हणून मिळालेला आहे. केंद्रात व राज्यात सत्ता आल्यावर खारेगावचा पूल केला. खारेगाव च्या अंतर्गत रस्त्यासाठी ७० कोटी आणले, १० कोटी तरणतलावासाठी आणले, भूमिपुत्र मैदानासाठी पाच कोटी मंजूर केलेत, डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी तीन कोटी रुपये मंजूर केलेत, खारेगाव च्या अंतर्गत पाईपलाईन्ससाठी साडेसात कोटी रुपये मंजूर केलेत, खुला रंगमंच केला, गॅस पाईपलाईन्स आणली अशी अनेक विकासकामे केली आहेत. क्लस्टर योजनेतून घराला घर देण्याचे काम करणार आहोत. कळवा ऐरोली एलिव्हेटेड मार्ग करतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळागाळातील लोकांसाठी अनेक योजना आणल्या. लोकांना जर डीपी रोड नको असेल तर शंभर टक्के डीपी रोड रद्द करु. लोकांना अपेक्षित कामे करण्यासाठी आपण निवडून आलो आहोत, नियम अटी लोकांच्या सुधिधेसाठी आहेत त्या जर लोकांना त्रासदायक ठरणार असतील तर त्या बदलल्या जातील.विधानसभेत चागले काम करण्यासाठी, सिस्टीम मध्ये काम करताना हेल्पींग हॅण्ड पाहिजे असतात, यामुळेच मला जे प्रेम, आशिर्वाद दिले तेच नजीब मुल्ला यांनाही द्या, आपण महायुतीमधून लढतो आहोत, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्यायचे आहे. वेळ बदल घडविण्याची आहे. मतदारसंघातील वेळ बदलायची आहे, चांगली वेळ आणायची असेल तर नजीब मुल्ला यांच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून त्यांना विजयी करा असे आवाहन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केले. खारेगाव येथील जुना रस्ता रद्द करण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला होता आणि शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला असताना, नवीन विकास आराखड्यात तोच रस्ता १२ फुटावरून नव्याने २४ फूटी करण्यात आला आहे. पण याबाबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांनी आयुक्तांना फोन केल्यावर आयुक्तांनी जुना रस्ता रद्द करण्याची हरकत नोंदवून घेतली. खारेगाव, पारसिक नगर, मनिषा नगर या परिसरातील सर्व विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत झालेली आहेत, कळवा मुंब्र्यातील विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ४० कोटीचा निधी मिळाला पण येथून १५ वर्ष आमदार असलेल्या व्यक्तीला ते शक्य झाले नाही. आगरी कोळी भवनासाठी पाच कोटीचा निधी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत आला आहे.भूमिपुत्राचे मैदान पुन्हा खेळण्यासाठी उपलब्ध करुन द्या, कळवा पारसिक नगर, खारेगाव परिसरात पेट्रोल पंप द्या, सीबीएसई व आयसीएसई शाळेसाठी दोन प्लाॅट द्या,  कळवा,खारेगाव, पारसिक नगर येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ९० फूट व ६० फूट रस्त्याला दोन कनेक्टीवीटी द्या, क्लस्टर योजना लागू करा, ॲथेलेटीकसाठी स्पोर्ट्स सेंटर करा, खारेगाव तलाव सुशोभिकरणासाठी निधी द्या, फास्ट ट्रॅक टनेलमध्ये रेल्वेमार्फत साऊंड व्हायरल टनेल बसविण्यात यावा, कळवा पूर्व व पश्चिम जोडणसाठी रेल्वे स्कायवॉक करा, अशा मागण्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत करुन १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट रीडेव्हलपमेंट होणार, सुसज्ज रस्ते करणार, कळवा, खारीगाव, पारसिक नगर परिसराचा विकास करणार असे आश्वासन मतदारांना बोलताना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *