अनिल ठाणेकर
ठाणे : गेली १५ वर्षे आमदार म्हणून ओवळा माजीवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मतदारांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी आहे. प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील या ॲन्टीइन्कबेन्सीमुळे मी नक्कीच विजयी होईल, असे मत ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी व्यक्त केले.
ओवळा माजिवडा परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार, घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी दुर करणार, महिला सुरक्षिततेसाठी व चोरीच्या घटनांवर पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही सर्विलन्साठी प्रयत्न करणार, एक हजार लोकांमागे एक सुलभ सौचालय बांधणार, शाळांची स्थिती सुधारणार, आवश्यक तेथे दुरुस्ती व आवश्यक तेथे नवीन शाळा उभारणार, दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणार, धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प बांधून बीएसयुपीच्या योजनेतील रहिवाशांना सर्वसुविधांनी सुसज्ज घरे मिळायला हवीत यासाठी प्रयत्न करणार. गेली १५ वर्षे आमदार म्हणून ओवळा माजीवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मतदारांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी आहे. ते पुन्हा निवडून यावेत असे लोकमत नाही. विकासाच्या नावाखाली, डबल विकास नाही तर दोन हजार गुने स्वतःचा विकास त्यांनी केला आहे, असे लोकच बोलत आहेत. या मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीतच शिंदे गटाचे मताधिक्य कमी झाले होते. तसेच प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील लोकांमधील असलेल्या नाराजीमुळे निर्माण झालेल्या ॲन्टीइन्कबेन्सीमुळे १५ ते २० हजार मतांनी मी नक्कीच विजयी होणार, असे मत ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी व्यक्त केले.
