ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह विकास मोरे, संदीप झिनवाल तसेच इतर महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
