ठाणे  : ठाण्याच्या आद्य श्री आनंद भरती व्यायामशाळेच्या विद्यमाने ११४ व्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ४२ व्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पहिल्या शॉर्ट गटातील देवा जिमच्या पुरुषोत्तम इरनकची ५८ स्पर्धामधून यंदाच्या आनंद श्री किताबासाठी निवड करण्यात आली.

श्री आनंद भरती मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत मर्यादित स्पर्धक असूनही चांगली चुरस पहायला मिळाली.दळवी ऑलिंपिया जिमचा यश दळवी स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक ठरला. स्पर्धेत १२ गुणांची कमाई करणाऱ्या बळीराम मोकाशी व्यायामशाळेला सांघिक विजेतेपद मिळाले. स्पर्धेचे उदघाटक कमलाकर पाटील यांचा पहिल्या वर्षीच्या रमेश चव्हाण स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना  कमलाकर पाटील म्हणाले रमेश चव्हाणसरांनी ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदासाठी माझे नाव सुचवले होते. त्यांनतर त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. नियमित व्यायाम हेच माझ्या यशाचे गमक असल्याचे ‘किताब विजेता पुरुषत्तोम इरनक याने सांगितले.

संक्षिप्त निकाल : गट पहिला – शॉर्ट : पुरुषत्तोम इरनक (देवा जिम),सतीश पुजारी (नव महाराष्ट्र), सुरेंद्र इंगवाल (मातोश्री जिम).

गट दुसरा – मिडीयम : आजाद जैनवाल (अपोलो जिम), अक्षय गायकर (ऍब्ज स्टुडिओ), विकास दयाळकर (श्री मावळी मंडळ).

गट तिसरा –  टॉल :मुंजा मुळे ( एम पॉवरफिट ), कंत्रम शेख (बळीराम मोकाशी व्यायामशाळा), किशोर जाधव (श्री मावळी मंडळ).

गट चौथा – सुपर टॉल : भूषण पाटील (अपोलो जिम), सागर घरत (बळीराम मोकाशी व्यायामशाळा),इम्रान शेख ( हाशिम जिम).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *