बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी बीडमधील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मतदान केंद्रावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक निधनाने बीडमध्ये शोककळा पसरली आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या तीव्र झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मतदान केंद्रावरच बाळासाहेब शिंदे यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
