नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, अनेक पुरस्कार विजेते व गार्डन ग्रुप ७ :‌५० समूहाचे खजिनदार श्री. रणवीर धनराज पाटील  यांनी २९ नोव्हेंबर  २०२४ रोजी गार्डन ग्रुप मधील आपल्या सहकाऱ्यांना  नवीन वर्षाच्या  (२०२५ ) जवळजवळ  १००  डायरी भेट दिल्या.
सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, वीमा  योजना ( एल. आय. सी.) कंपनीमार्फत आपल्या सहकाऱ्यांना नेहमी  प्रामाणिकपणे सेवा देणारे, सर्वांना संकटकाळी मदत करणारे, अनेक बक्षिसे घेऊन प्रगतीचा आलेख  उंचावणारे सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांना  नगरसेवक सोमनाथ वास्कर, सामाजिक कार्यकर्ते भाऊ  भापकर, उध्दव ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख अजय पवार, शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, शिवसेना ( शिंदे गट )उपविभाग प्रमुख अजित सावंत,  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे, गणपत वाफारे, ज्येष्ठ नागरिक मारुती शिंदे इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या  सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गार्डन ग्रुपच्या अनेक  सदस्यांनी लगेच एल. आय. सी. ची नवीन पॉलिसी घेण्याचे आश्वासन दिले. गार्डन  ग्रुपची एकजूट दाखवून दिली त्याबद्दल रणवीर पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *