नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत (१) श्रीम. छाया दत्ता किर्जत, एस.एस टाईप, रूम नं 495,सेक्टर-17,कोपरखैरणे, नवी मुंबई, व (२) श्रीम.प्रभावती मच्छींद्र पाटील,घर क्र.0591, युनिटस 0003, बोनकोडे कोपरखैरणे नवी मुंबई. यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त श्री. प्रबोधन मवाडे, कनिष्ठ अभियंता श्री. सचिन नामवाड व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी नमुंमपा पोलीस बंदोबस्त होता. तसेच 9 मजूर, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर 01,पिकअप व्हॅन 01 कारवाई करीता वापर करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
0000
