अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीत

षडयंत्र रचून भाजपाने विजय मिळविला असा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

 केजरीवाल एक्स वरील पोस्टमध्ये म्हणतात, “दिल्लीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर लोकांची मते कापण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले  आहे. हजारो मतदारांची मते कापण्यासाठी भाजपने अर्ज दाखल केला आहे. लवकरच यावर मोठा खुलासा करणार आहे. या लोकांनी हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडऊक अशीच जिंकली का? भाजपवालो मी तुमचा डाव दिल्लीत यशस्वी होऊ देणार नाही,” अशी पोस्ट केजरीवालांनी केली.

अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन केल्यापासून सातत्याने दिल्लीत विजय मिळवत आहेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीतही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने विधानसभेच्या ६३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ ७ जागांवर यश मिळवता आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षात अरविंद केजरीवालांसह पक्षातील काही नेत्यांवर मद्य घोटाळ्यासह इतर आरोप झाले आहेत. केजरीवालांसह अनेक नेत्यांना तुरुंगातही जावे लागली आहे. त्यामुळेच आता यंदाही निवडणूक खूप महत्वाची असणार आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या या पोस्टनंतर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षित विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसच्या बाजूने वातावरण असतानाही, मोठा विजय मिळवला. तसेच, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या बाजूने असलेला मतप्रवाह आपल्याकडे आणण्यात यशस्वी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *