मुंबई मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीकपात केल्यामुळे ठाणे व भिवंडीकरांनाही दिलासा मिळाला आहे.

पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये ३० नोव्हेंबर रोजी तांत्रिक बिघाड झाल्याचे समजताच महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीचे काम १, २ डिसेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. पाणीपुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा स्थिर झाल्यानंतर शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी पाणीकपात मागे घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही या पाणीकपातीचा परिणाम झाला होता. मात्र, आता पाणीकपात मागे घेतल्यामुळे मुंबईसह ठाणे व भिवंडीकरांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *