पनवेल : बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जागतिक मानवाधिकार दिनादिवशी अर्थात मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने पनवेलमध्ये मानवी साखळी द्वारे निदर्शने करण्यात येणार आहे. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार थांबवण्यासाठी व इस्कॅानच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी यासाठी सायंकाळी ४. ३० वाजता पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हे निदर्शने होणार आहे.
बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी, आदिवासी व दलित हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरता वाद्यांच्या अमानवीय अत्याचारांपासून मुक्ती मिळावी .
बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे. या सर्व अत्याचारांची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. त्यामुळे अत्याचार थांबण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने निदर्शने करण्यात येणार आहे.