अलिबाग : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. विजेवर चालणाऱ्या या बसची पहिली सेवा अलिबाग-ठाणे या मार्गावर रविवारी सुरू झाली आहे. अलिबागमध्ये चार्जिंग युनिट नसल्याने या बस ठाणे आगारातून येणार आहेत.ठाणे आगारातून सकाळी पाच, दुपारी तीन, सायंकाळी चार, पाच वाजता शिवाई बस सुटणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाने कात टाकण्यास सुरुवात झाली असून, रायगड जिल्ह्यात २०० बस सीएनजीवर चालणाऱ्या आल्या आहेत. यासाठी पाच बस आगारात सीएनजी पंप सुरू करण्यात आले आहेत. कोणत्याच बस आगारात ई-चार्जिंग सुविधा सुरू झालेली नाही. त्यामुळे ठाणे येथून या फेऱ्या सुरू करण्यात आल्‍या आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी दिली. या सेवेमुळे अलिबाग ते ठाणे हा प्रवास प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *