बोरीवली पूर्व येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभागसंघटक सौ. रेखा शांताराम बोऱ्हाडे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कृष्णराव अर्जुन केळुसकर लिखित छत्रपती शिवाजी महाराज हा ग्रंथ त्यांना सस्नेह भेट देतांना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी. मागाठाणे मित्र मंडळाचे कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे पदाधिकारी दिलीप देसाई यांचाही वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.(छाया : शाम साळवी)