आमदार संजय केळकर व प्रेरणा संस्थेच्या वतीने
अनिल ठाणेकर
ठाणे : आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील १२ वी कॉमर्स व सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात १५, २२, २९ असे दर रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचे आयोजन केले आहे.
सराव २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता पाच मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद ठेवून ईव्हीएमचा प्रतिकात्मक निषेध करा – राजन राजे हे १२ वे वर्ष आहे. ब्राम्हण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम, व महाराष्ट्र विद्यालय या दोन परीक्षा केंद्रावर सकाळीं ११ ते दुपारी २ या वेळेत बोर्ड पध्दतीने सराव परीक्षा पार पडणार आहेत. 8 तारखेला सायन्स चा फिजिक्स तर कॉमर्स चा इको पेपर असेल.१५ तारखेला केमेस्ट्री व बी. के. पेपर २२ तारखेला सायन्स चा मॅथ्स व ओ. सी. २९ तारखेला सायन्स चा बायोलाॅजी व कॉमर्स चा मॅथ्स असे पेपर होणार आहेत. विध्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी, सहजरीत्या व सोप्या पद्धतीने पेपर लिहता यावा, त्याचा सराव व्हावा या करिता ही सराव परीक्षा आयोजित केली जाते. ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे, मुख्य बोर्ड परीक्षा आधी चांगला सराव मिळणार आहे. असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. यावेळी प्रेरणा संस्थेचे पंढरीनाथ पवार, संतोष साळुंखे उपस्थित होते. यासाठी प्रेरणा संस्थेचे पंढरीनाथ पवार व संतोष साळुंखे यांच्याशी संपर्क करावा. पत्ता :- ठाणे भारत सहकारी बँक समोर, बाजी प्रभू देशपांडे रोड विष्णूनगर नौपाडा ठाणे. मोबाईल : ८०८२३७७७११, ९०२२०५६०६० वरील पत्यावर सराव परीक्षा फॉर्म मिळतील, असे सांगण्यात आले आहे.
00000
