मुंबई : १३७ वर्ष उच्चतंत्र शिक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या माटूंगा मुंबई येथील व्हीजेटीआय या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बहुजन कामगारांच्या न्याय हक्कासाठी मागील ३० वर्षांपासून लढणाऱ्या व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा डॉ प्रमोद वानखडे यांची एकमताने निवड करण्यात आली .संघटनेचे संस्थापक प्रा प्रवीण देशमुख यांनी ही निवड जाहीर केली. संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह समाजातील अनेक संस्था आणि संघटनातील पदाधिकाऱ्यांनी या निवडीबाबत समाधान व्यक्त केले व प्रा डॉ प्रमोद वानखडे यांचे अभिनंदन केले.व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या सचिव पदी फिरोज शेख, उपाध्यक्षपदी प्रा डॉ विनोद सुर्यवंशी, श्री दिनकर कचरे, सहसचिवपदी श्री गोपाळ धारपवार, श्री बंडू इलग , कोषाध्यक्ष प्रा चेतन भोळे, सहकोषाध्यक्ष सुमेध जाधव व अजिंक्य जाधव यांच्या सह संपूर्ण कार्यकारिणीची घोषणा व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे संस्थापक प्रा प्रवीण देशमुख यांनी केली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असेल.
३० वर्षांपूर्वी १६ मार्च १९९४ रोजी सर्व जाती धर्माच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोबत घेवून व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची स्थापना करण्यात आली. मूळचे अमरावती येथील रहिवासी असलेले प्रा डॉ प्रमोद वानखडे हे व्हीजेटीआय मधे २००० मधे रूजू झाल्यापासून व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सक्रियपणे सहभागी होत आलेले आहेत. त्यांनी यापूर्वी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या कार्यकारणीमधे विविध पदांवरती काम केलेले आहे. प्रा डॉ प्रमोद वानखडे हे पुरोगामी विचारांच्या अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांशी संबंधित आहेत. *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सायन-माटुंगा शाखेचे ते कार्याध्यक्ष आहेत.
भटक्या विमुक्तांच्या आणि एकंदरीतच सर्वच मागासवर्गीयांच्या प्रश्नांची जांण असलेले तसेच विपरीत परिस्थितीतीतून मार्ग काढीत उच्च शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले प्रा वानखडे हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणारे कार्यकर्ते आहेत.
त्यांच्या या निवडीबाबत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते प्रा. प्रेमकुमार बोके , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नॉवेल साळवे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्ट चे विश्वस्त श्री गणेश चिंचोले, राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे ॲड अमोल मटाले, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा डॉ प्रमोद वानखेडे यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बहुजन कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी सर्वार्थाने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, असा संकल्प प्रा डॉ प्रमोद वानखडे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला आणि आपल्यावरील दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले.
0000
