२री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा
मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या सुपेश कामतेकरने महाराष्ट्राच्या माजी विश्व् विजेत्या प्रशांत मोरेवर २२-१८, ५-२३, २०-१२ असा चुरशीचा विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या महम्मद साजिदने महाराष्ट्राच्या माजी विश्व् विजेत्या योगेश परदेशीवर ३-१६, १९-१३, १५-१० असा खळबळजनक विजय मिळवून आगेकूच केली. एका वेळी २४ सिस्का कॅरमवर खेळविण्यात येणाऱ्या एकंदर १० लाखाची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर मालदीवज, श्रीलंका व अमेरिकेच्या खेळाडूंच्या सहभागाने हि स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे.
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.
संदीप सावंत ( महाराष्ट्र ) वि वि सलमान खान ( महाराष्ट्र ) ११-८, १४-१५, १७-३
अभिषेक भारंबे ( महाराष्ट्र ) वि वि तुलसीदास हळर्णेकर ( गोवा ) २३-११, ७-२५, २३-१
जलालुद्दीन मुल्ला ( महाराष्ट्र ) वि वि नवीन चीकलापुडी ( अमेरिका ) २५-१३, १६-१७, १९-५
संतोष डोखे ( महाराष्ट्र ) वि वि सचिन बांदल ( महाराष्ट्र ) ८-९, २२-१, २५-१४
राजेश गोहिल ( महाराष्ट्र ( वि वि एस ए. इकबाल ( मध्य प्रदेश ) २५-४, २०-८
संजय मणियार ( महाराष्ट्र ) वि वि यमान जलील ( मालदिवज ) १५-२, १८-८
जुगल किशोर दत्ता ( आसाम ) वि वि प्रफुल रसाळ ( महाराष्ट्र ) ११-५. १६-४
एस के महम्मद ( तेलंगणा ) वि वि प्रकाश दुधाळे ( महाराष्ट्र ) १६-१०, २१-४
हारून शेख ( महाराष्ट्र ) वि वि गिहन चमारा ( श्रीलंका ) ६-१९, २०-२, २५-९
महम्मद अहमद ( तेलंगणा ) वि वि शरद मोरे ( महाराष्ट्र ) १५-०, १७-१०
अनिल मुंढे ( महाराष्ट्र ) वि वि तैमूर अश्रफ ( दिल्ली ) ७-१५, २३-६, २३-०
