0000
ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आयोजित खुल्या रोचेस बुद्धीबळ स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन क्लबच्या अध्यक्षा मेधा जोशी यांनी केले आहे. ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने हि स्पर्धा २९ डिसेंबर रोजी रोटरी क्लब सेंटर , शाळा क्रमांक १९ , विष्णू नगर नौपाडा , ठाणे पश्चिम येथे खेळवण्यात येईल. दोन सत्रात होणाऱ्या या स्पर्धेत सकाळच्या सत्रात ८,११ आणि १५ वर्षाखालील वयोगाची स्पर्धा खेळवली जाईल. दुपारच्या सत्रात खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ४९ हजार रुपयांच्या रोख बक्षिसांनी गौरवण्यात येणार आहे.रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ५० वर्षावरील, सर्वोत्तम महिला, सर्वोत्तम बिगर मानांकित, विशेष मुलांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव डॉ दिपक तांडेल (९८३३०४९२२५) किंवा आंतरराष्ट्रीय मास्टर मोहित लढे (९०२९१०६५७०) यांच्याशी संपर्क साधावा.स्पर्धेच्या प्रवेशिका २६ डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील असे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे सचिव अमोल नाले यांनी सांगितले.
