माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम

ठाणे : माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन जलसिंचन क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळाचे मुख्य मार्गदर्शक आनंद भागवत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या सदस्य वृषाली वाघुले यांनी शिबिराचे आयोजन केले होते. गेल्या १८ वर्षांपासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीदिनी विश्वास सामाजिक संस्थेकडून शिबीर भरविले जात आहे. या शिबिराला भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, सरचिटणीस शीतल कारंडे, भाजयुमोचे शहर सरचिटणीस प्रशांत कळंबटे, महिला मोर्चाच्या ओवळा मंडल अध्यक्षा अर्चना पाटील, मध्य मंडल अध्यक्षा कांचन पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध सेल प्रमुख यांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *