ठाणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा, घाटकोपर व रोटरी क्लब ऑफ मुंबई, घाटकोपर यांनी ‘चला बनूया जबाबदार वाहन चालक’ (Don’t Drink & Drive) असा मजकूर असणारे पत्रके घाटकोपर येथील श्रेयस सिग्नल येथे वाहन चालकांना वाटण्यात आली. यावेळी नवीन वर्षांचे स्वागत दूध पिऊन करा. ‘द’ रे दुधाचा, दारुचा नव्हे….! अंनिसने नवा संदेश दिला आहे.
यावेळी अंनिसचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर, राज्य सरचिटणीस विजय परब, रोटरी क्लबच्या अध्यक्षा श्रुती धरमशी, अंनिस घाटकोपर शाखा अध्यक्ष केतन शहा, मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष नंदना गजभीये, घाटकोपर शाखा कार्याध्यक्ष निर्मला माने, प्रधान सचिव अनंत जोशी, शहाजी पाटोदेकर,रुपेश शोभा, छाया धनवे, गौरी जाधव, निलीमा जाधव ,संदेश बालगूडे, संदेश खळे, कल्पेश बद्रिके सावंत, विलास पाटोदेकर, रूपाली कांबळे, संदीप गोवळकर आदी कार्यक्रर्ते उपस्थित होते.
यावेळी अंनिस व रोटरी क्लब च्या कार्यकर्त्यांनी श्रेयस सिग्नल ठिकाणी थांबणार्या वाहना, चला बनूया जबाबदार वाहन चालक ! (Don’t Drink & Drive) अशा मजकूर असणारी पाच हजार पत्रके गुलाब वाटण्यात आली.
यावेळी माध्यमाशी बोलताना अंनिसचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीळकर म्हणाले की, नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिक मद्यपान किंवा इतर नशेचे पदार्थ सेवन करुन करतात, केवळ मजा म्हणून केलेली ही सुरूवात पुढे व्यसनात कधी बदलते हे त्यांचे त्यांना कळत नाही. त्यामुळे कोणत्याही निमित्ताने अशी व्यसनाधीनतेकडे जाणारी मजा करण्यापेक्षा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने दरवर्षी विविध, अनोखे उपक्रम राबवले जातात अंनिस नेहमी व्यसनाच्या विरोधात आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दारू पिऊन वाहन चालवणे चूकीचे आहे. त्यामुळे अपघात होतात. या अपघातामुळे अनेक कुटूंब उध्वस्त होतात. त्यामुळे आपण दारु न पिता दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करा. ‘धुंदित नाही तर शुध्दीत’ नवीन वर्षाचे स्वागत करा. असे यावेळी सांगितले.
यावेळी माध्यमाशी बोलताना अंनिस घाटकोपर अध्यक्ष केतन शहा म्हणाले की, दारु पिऊन वाहन चालवल्याने वाहन चालवल्याने अपघात होतो. प्रवासी व इतर माणसांचा अपघात जखमी होतात. काहीना तर कायमचे अपंगत्व येते. यासाठी आपण कोणतेही व्यसन न करता वाहन चालवणे गरजेचे आहे. जर आपला मित्राने मद्यपान केल असेल तर त्याला वाहन चालवण्यास देऊ नका. आपण सर्वांनी रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन दिले पाहिजे असे ही यावेळी सांगितले.
यावेळी माध्यमाशी बोलताना रोटरी क्लबच्या अध्यक्षा श्रुती धरमशी म्हणाल्या की, दारु न पिता वाहन चालवणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण वाहन चालवताना कोणतेही व्यसन करु नये. सर्वात जास्त अपघात हे दारु पिऊन वाहन चालवल्याने होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवन हानी होते. हे जर थांबवणे गरजे आहे. आपण नवीन वर्षाच्या संकल्प करु या. कोणतेही वेसन करुन वाहन चालवणार नाही. असे ही यावेळी सांगितले.
या उपक्रमामध्ये अंनिस घाटकोपर अध्यक्ष केतन शहा यांचे मोलाचे योगदान लाभले.उपक्रमादरम्यान,यामध्ये अंनिस कार्यकर्त्यांसोबत रोटरी क्लबचे कार्यकर्ते, जागरुक नागरिक, हितचिंतक उपस्थित होते.
वाहतूक किंवा रहदारीस कोणताही अडथळा न आणता हा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करुन, अशा समाजपयोगी गोष्टींची गरज आहे,अशा प्रतिक्रिया दिल्या. शेवटी घाटकोपर शाखेच्यावतीने शहाजी पाटोदेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
००००
