मुंबई : महापौर बंगला ही वास्तू म्हणून आम्ही पाहात नाही, आमचं त्याच्याशी भावनिक नातं आहे. शिवसेना प्रमुख आणि युतीच्या अनेक बैठका याठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे या वास्तुचं वैभव जपून तिथे काम करणे अवघड होती. महापौर बंगला एक भावनात्मक बंधन आमच्यासाठी आहे.  हेरिटेज वास्तूला हात न लावता काम करणं अवघड होतं. या सगळ्या मर्यादा पाळून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे. याचे श्रेय साऱ्यांचे आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना संबधित साऱ्यांचे कौतुक केले.

  वास्तुविशारद आभा लांबा यांनी या स्मारकाचे काम केलं… लांबा यांनी सांगितलं भूमिगत दालन आपण करूया. खबरदारी घेणं आणि काम पूर्ण करणे ही जिक्रिचा आणि अवघड बाब होती.  आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांचे यासाठी अभिनंदन. त्यांना मी धन्यवाद देतो असे ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पाहणी आज उद्धव ठाकरे यांनी केली.   उद्धव ठाकरे म्हणाले, गेली काही वर्ष बाळासाहेबांच्या स्मारकाचा काम सुरु होतं आणि चर्चा सुद्धा सुरु होती.  सावरकर स्मारक सुद्धा बाजूला आहे. ज्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक होतं आहे, त्याच्या बाजूलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे. बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे असे हे स्मारक असेल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *