नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्त मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते, इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन संपन्न झाले. यावेळी महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहाबाहेरील राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.