डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या वतीने डोंबिवलीत बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 1 लाख पुस्तके मांडण्यात आली होती. हजारो वाचकांनी या उपक्रमास भेट देत मोफत पुस्तकांचा खजिना लुटला.

गतवर्षीपासून सुरू झालेल्या भारतातील या पहिल्यावहिल्या उपक्रमामध्ये वाचन प्रेमींसाठी विनामूल्य पुस्तके देण्यात आली. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या वतीने सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवली हा उपक्रम राबविण्यात आला. फडके रोडवर रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून याची सुरवात झाली.

५ तासात या उपक्रमास 8 हजारच्या आसपास नागरिकांनी उपस्थिती लावत पुस्तकांचा खजिना लुटला. वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये रसिकांना कूपनद्वारे प्रवेश दिला जात होता.

त्यावर तिथे उपलब्ध असलेले कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे मोफत निवडता येत होते. गेल्यावर्षी साडे चार हजार वाचकांनी या उपक्रमाला भेट दिली होती. पुस्तकांपासून तयार केलेली ‘आय लव्ह बुक्स’ ही प्रतिकृती यंदाच्या बुक स्ट्रीटचे खास होते. बुक स्ट्रीट उपक्रम यशस्वी होण्यास कल्याण डोंबिवली महानगरपलिका, डोंबिवली शहर वाहतूक विभाग आणि डोंबिवली शहर पोलिस विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *