शिवसेना- मनसे युती झाल्याने दिव्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा स्टेशनला जल्लोष

दिवा : मुंबईत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्साव सुरु झाला. या ऐतिहासिक निर्णयाचे जल्लोषात स्वागत करत दिवा शहरात शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत दिवा स्टेशन परिसरात जोरदार आनंदोत्सव साजरा केला.

युतीच्या घोषणेची बातमी समजताच दिवा शहरातील शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली, तसेच एकमेकांना आणि प्रवाशांनाही पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, मनसे सचिव प्रशांत गावडे, मनसे शाखाध्यक्षा नम्रता खराडे, निकिता सालप, अंकिता कदम, सागर निकम, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, मनसे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे, या जल्लोषात मनसे व शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

दोन्ही पक्षांची ताकद आता एकत्र आल्याने दिव्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, आगामी काळात ही युती विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरेल, असा विश्वास सामान्य नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *