भाजपाच्या मंदा पाटील आणि ज्योती पाटील बिनविरोध विजयी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर यांच्या पाठोपाठ आणखी दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पॅनल क्रमांक २७ अ मधून मंदा पाटील आणि पॅनल क्रमांक २४ ब मधून ज्योती पाटील असे या बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या महिला उमेदवारांचे नाव आहे. मंदा पाटील आणि ज्योती पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता ५ वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *