अहंकारी रावणाची लंका पेटवून विकासाचा भगवा फडकवणार! – प्रताप सरनाईक

शिंदे शिवसेनेचा ‘वचननामा’ जाहीर

मिरा-भाईंदर : ‘विकासाचे व्हिजन हेच प्रताप सरनाईक यांचे मिशन’ अशा शब्दांत आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडत प्रताप सरनाईक* यांनी आज मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा ‘वचननामा’ प्रसिद्ध केला. “गेल्या १० वर्षांपासून महापालिकेवर बसलेल्या भस्मासुराचा अंत करण्याची वेळ आली असून, अहंकारी आणि भ्रष्टाचारी रावणाची लंका हा हनुमान जाळल्याशिवाय राहणार नाही,” अशा तडाखेबंद शब्दांत सरनाईक यांनी राजकीय विरोधकांना शिंगावर घेतले आहे.

ही ‘वचने’ नाहीत, तर ‘कृती’चा अहवाल!

मिरा-भाईंदरच्या रणसंग्रामात शिवसेनेने ८१ शिलेदार मैदानात उतरवले आहेत. इतर पक्ष केवळ आश्वासनांची खैरात करत असताना, सरनाईक यांनी मात्र ‘काम काय केले आणि आता काय करणार’ यावर भर दिला आहे. जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात ९०% पूर्ण झालेली विकासकामे आणि उर्वरित प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. “आम्ही केवळ हवेत किल्ले बांधत नाही, तर वास्तवात उतरवतो,” असा टोलाही त्यांनी लगावला.

मी केलेल्या विकासकार्यांवर विश्वास ठेवून जनता मला महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची संधी देईल आणि जर ही संधी मला मिळाली तर नक्कीच मिरा-भाईंदर शहर हे येत्या काळात अधिक विकसित, सुंदर, स्वच्छ आणि स्वप्नातील शहर बनल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी शेवटी प्रकट केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *