कल्याण स्टेशन मधील सफाई कर्मचार्यासाठी एक हात मदतीचा
मुकुंद रांजणे
माथेरान : तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्ट मुंबईच्या ३९व्या वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधून नववर्षाचे स्वागत एक हात मदतीचा..ह्या उपक्रमांद्वारे तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई ..रोटी डे ग्रुप कल्याण व स्वामी नारायण हॉल कल्याण यांच्या सहकार्याने व ट्रस्टच्या ऐक्टिव सभासद यांच्या संकल्पनेतून कल्याण साफसफाई कर्मचारी (Housekeeping staff) यांना अत्यावश्यक अन्नधान्याचे पाकिटे (किट) यांचे मोफत वाटप शनिवार ३ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वा कल्याण स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये शशांक दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते.
मान्यवर अतिथि मध्ये नितिन भाई (रोटी डे ग्रुप, कल्याण), दिनेश जे ठक्कर(स्वामी नारायण हॉल, कल्याण), मधुबेन जे ठक्कर, ज्योति बेन पुजारा (समाजसेविका ), रेल्वेचे मान्यवर अधिकारी हरजीराम मीणा (स्टेशन मॅनेजर कल्याण), राहुल गुज़रे (CPS- कल्याण), राहुल मालवीया(DY CPS कल्याण) व ट्रस्टचे अध्यक्ष डि व्ही चिंदरकर ..वरील मान्यवरांच्या हस्ते ६५ सफाई कर्मचारी यांना वाटप करण्यात आले.. ट्रस्टतर्फे सेक्रेटरी हरिश मोंडकर, खजिनदार गिरिश कदम, उपाध्यक्ष अभय कांबळे, ट्रस्टी आर एम बिरवटकर, प्रसाद करलकर, ऐक्टिव सभासद सुनील नैनानी, पी डि मोरे, युवराज डोहाळे उपस्थित होते.
