मुंबई, ठाण्यात वर्षात २ हजार गृहनिर्माण प्रकल्पांना मंजूरी !
मुंबई :  महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) गेल्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यभरातील एकूण ४ हजार २८२ प्रकल्पांना नोंदणीक्रमांक मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल २ हजार प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मंजूर झाले आहेत. मुंबई शहर १०३ आणि उपनगर ५८७ असे मिळून ६९० प्रकल्प आहेत. यानंतर ६७५ प्रकल्प ठाणे जिल्ह्यात मंजूर केले आहे. यानंतर रायगड ३८४ आणि पालघर २५८ इतक्या गृहनिर्माण प्रकल्पाना मंजुरी मिळाली आहे. यामुळे महानगर प्रदेशातील विविध शहरांमध्ये यंदाच्या वर्षात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभे राहणार आहेत. अशी माहिती महारेराच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
मुंबई आणि परिसरातील स्थावर संपदा बाजार सातत्याने वाढीच्या दिशेने प्रवास करत आहे. ठाणेकल्याणडोंबिवली परिसरनवी मुंबईउल्हासनगरअंबरनाथ तसेच पालघरबोईसर या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गृहसंकुलांची बांधकामे सुरू आहेत. या भागांमध्ये अधिकतर महारेरा मंजुऱ्या मिळाल्या आहेत. करोना काळानंतर थांबलेले किंवा विलंबित झालेले अनेक प्रकल्प पुन्हा गती घेत आहेत. तर नागरिकांची वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार लागणारी घरे यामुळे मोठया प्रमाणात नवीन घरांची उभारणी केली जात आहे.
दसरा आणि दिवाळी हे स्थावर संपदा क्षेत्रासाठी परंपरेने शुभ मानले जाणारे सण आहेत. या काळात नवीन प्रकल्पांची घोषणा व विक्री मोहिमा सुरू करण्याची प्रथा आहे. मागील वर्ष देखील याला अपवाद नव्हते. महारेराने गेल्या वर्षी दसऱ्याच्या काळात विक्रमी मंजुऱ्या दिल्या. दसऱ्याच्या मुहूर्तावर एमएमआर क्षेत्रात तब्ब्ल ८०९ प्रकल्पाना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये ४०५ प्रकल्पांना नवीन नोंदणी क्रमांक२०९ प्रकल्पांना मुदतवाढतर १९५ प्रकल्पांमध्ये प्रस्तावित सुधारणांना मंजुरी देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *