पालिका निवडणुकीच्या शेवटचा रविवार घरोघरी प्रचाराचा धुराळा
कल्याण:  कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांचा प्रचार करण्यासाठी अवघे दहा दिवसच मिळाले. त्या दहा दिवसात केवळ दोनच रविवार उमेदवारांच्या हाती लागले. आज शेवटचा रविवार असल्याने कल्याण डोंबिवलीत बहुतांश मतदार नोकरदार वर्ग असल्याने नोकरदार मतदारांना रविवारी सुट्टी असल्याने मतदारांना भेटण्यासाठी सर्वच उमेदवारांनी नियोजन केल्याने दिवसभर मतदारांची गाठीभेटी घेण्यावर भर घातला जाणार असल्याने रविवारचा दिवस प्रचाराचा धुमाकुळ घालणारा  सुपर संडे ठरणार आहे.
महापालिका निवडणूकीत काही उमेदवारांनी एआयचा आधार घेत त्यांनी केलेल्या प्रचाराच्या कामांचे व्हीडीओ तयार करुन ते सोशल मिडियावर टाकले आहेत. या निवडणूकीत प्रचारासाठी प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. त्याचबरोबर फेसबूक, व्हाटसअप ग्रुप आणि इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकून प्रचार केला जात आहे. महापालिका निवडणुकीत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर जास्त भर दिला जात आहे. अन्य प्रचार तंत्रापेक्षा घरोघरी जाऊन भेटी देताना सुट्टीचा दिवस गाठला जात आहे. प्रचाराच्या अंतिम चरणात मतदारांच्या घरी जाऊन उमेदवार आम्हाला निवडून द्या असे आवाहन करीत आहे. प्रचाराचा हा रविवार  सुपर संडे ठरणार आहे. सुट्टीच्या दिवशी मतदार घरी असतात. त्यांना उमेदवार गाठतात. त्यामुळे प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वत्रच प्रचार फेऱ्यानी धुमाकूळ घालणारा असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *