भाजपाने अख्खी मुंबई विकायला काढली आहे, अशा शबदात राज ठाकरे यांनी भाजपाच्या अदानी प्रेमाचा बुरका टराटरा फाडला. २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर एका व्यक्तीने माहिती दिली, माझी रिसर्च टिम कामाला लागली. आत्ता हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे दाखवल्यानंतर तुम्हाला भीती नाही वाटली तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या, आपण डोळेझाक करून टाकतोय. मी २०१४ चा भारताचा मॅप दाखवतो असे म्हणत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ केला. त्यामध्ये, गौतम अदानींचे प्रोजेक्ट किती होते आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी आणि नंतर गौतम अदानी कुठे आहेत याची माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच, तुम्हाला नाही धक्का बसला तर बघा.. असेही ते म्हणाले.

हे फक्त १० वर्षातलं आहेजगात कोणता व्यक्ती नसेल एवढा १० वर्षात श्रीमंत झालाएकाच माणसाला एवढ्या गोष्टी दिल्या. जगातला  नंबरचा सिमेंट उद्योगमध्ये मोठे झालेले अदानी आहेत. २०१४ आधी हा सिमेंट उद्योगात कुठेच नव्हताएमएमआर रिजनमध्ये यांनी काय केलं ते मी वाचून दाखवतो. तुम्हाला कळतंय काय चाललायअसे म्हणत राज ठाकरेंनी अदानींच्या संपत्तीचा उल्लेख केला. वाढवण बंदर येतंय मी म्हटलं चांगलं आहेनंतर तिथे विमानतळ करतायकशाला तर मुंबई विमानतळाचं कार्गो तिकडे शिफ्ट करणार आहेत. मुंबई विमानतळाची जागा यांना हवी आहे, नंतर ही जागाही ते अदानीच्या घशात घालतील असा आरोप राज ठाकरेंनी केला. स्वकीयांचा घात करणारी औलाद फक्त पक्षात नसतेराजकीय पक्षात सुद्धा असते. वाढवणला लागून गुजरात आहेत्यासाठी पालघर हातात घ्यावा लागेल. ठाण्याचा भाग हातात घ्यावा लागेलमुंबई गुजरातला  कशी जोडायाची याचा लॉन्ग टर्म प्लॅन सुरु आहेअसा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *