सर्वद फाउंडेशन आयोजित
‘सर्वद स्टार पुरस्कार’ २०२६
मुंबई: सर्वद फाऊंडेशनच्या वतीने सर्वद स्टार पुरस्कार २०२६ दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२६ आहे. पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत होणार आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थीना नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शिक्षण विभाग, शिक्षक, प्राध्यापक, खेळ, कला, चित्रपट, सामाजिक कार्य, इतिहास, वित्त, प्रेस, मीडिया, वैद्यकीय, व्यवसाय, संशोधन, समाजसेवक,कवी, लेखक, कलाकार, चित्रकार, पर्यटन, प्रशासकीय सेवा, संगीत यापैकी किंवा इतर क्षेत्रातील मान्यवर आपले नामांकन पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी ८६५२५६१८६७ किंवा ८६५५९ २०५७१ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच आपला प्रस्ताव मजकूर लिहून पाठवावा. पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती डॉ. सुचिता पाटील आणि ओंकार देशमुख संचालक, सर्वद फाउंडेशन यांनी कळवले आहे.
