स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकींच्या निकालानंतर महाराष्ट्रात आता फक्त एकच ब्रँड डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट असल्याचे आज सिध्द झाले. राज्यातील भाजप व महायुतीच्या विजयामागे फडणविसांचा विकासाचा अजेंडा आणि डबल इंजिन सरकारचा विश्वास असल्याचे निकालातून दिसून आले. “डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच आज महाराष्ट्राचा ब्रँड बनला आहे,”.
केवळ शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातही आलेले निकाल हे विकासावरचा पर्यायाने भाजपावरील विश्वास दर्शवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते, असा स्पष्ट कौल मतदारांनी या निकालाव्दारे दिला आहे. राज्यातील २९ महानगर पालिकात भाजपचे ५१ टक्क्यांहून अधिक उमेदवार विजयी झाले आहेत. भारतीय जनात पक्षाचा महाराष्ट्रातील आजवरचा हा सर्वाधिक भव्यदिव्य असा विजय आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासारके दिग्गज नेते भाजपाचे महाराष्ट्रात नेतृत्व करीत असतानाही विधानसभेपाठोपाठ नगरपंचायत आणि महानगर पालिकेत भाजपाला मिळालेले नाही.
मुंबईत भाजपाचा पहिल्यांदा महापौर बनणार आहे. भाजपा आणि एकुणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची तब्बल दोन पीढ्यांनी पाहिलेलेली स्वप्नपुर्ती त्यामुळे होणार आहे.
महानगर पालिकांच्या या निकालामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकाच निकालात राज्यातील अनेकांना निकालात काढले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील राजकारणातील महत्व संपुष्टात आणले. मुंबईतून ठाकरेंच्या सत्तेला हादरा दिला. आणि हो महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या महत्वकांक्षेलाही मुंबईतील निकालामुळे आळा घातला आहे. नाही म्हणायला शिंदेंनी ठाण्याचा गड राखला असला तरी खरी शिवसेना म्हणून स्वताला साबित करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्रात भाजपापुढे या सगळ्यांचीच पिछेहाट झाली आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्ह हिरावून घेतल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी ज्याप्रकारे महायुतीला लढत दिली त्याची दखलही इतिहास घेईलच. पण तुर्तास महाराष्ट्रात देवेंद्र नाम ही काफी है…. हेच खरे.
पक्ष भाजपा शिंदे ठाकरे मनसे काँग्रेस इतर
मुंबई ८८ २८ ६६ ६ २४ १३
२२७ ११६ ७२
ठाणे २८ ७१ १ ० ० ३१
१३१ ९९ १
