मुंबईच्या महापौरपदावरून राजकारण पेटलं !

चेहऱ्यावर हसू आणि पडद्यामागे डावेपच

स्वाती घोसाळकर

मुंबऊ : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या मतमोजणीही झाली पण अजूनही महापौरपदाचा प्रश्न कायम आहे.  भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा महापौर पायउतार होऊ नये असे भावनिक कार्ड शिंदेंच्या शिवसेनेकडून खेळले गेल्यामुळे एकच राजकीय गोंधळ उडाला आहे. निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर जाहिरपणे सर्वाधिंक जागा जिंकणाऱ्या भाजपाचा महापौर होणार असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जाहिर केले होते. त्यानंतर अनपेक्षितरित्या शिंदेंनी आपल्या नगरसेवकांनी ब्रांद्याच्या ताज हॉटेलमध्ये मुक्कामाला नेल्यानंतर राजकीय चर्चांना उत आला आहे. तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही देवाची इच्छा असेल तर महापौर शिवसेनेचा होईल अशी गुगली टाकली आहे. सध्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असले तरी पडद्यामागे जोरदार राजकीय चर्चा चालू असल्याची ‘बितंबातमी” आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधिल दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले आहेत. पहिली अडिचवर्षे शिंदेंच्या शिवसेनेला महापौरपद मिळावे अशी मागणी पुढे आल्याने सध्या भाजपाकडून सावध एका पुढल्या हाका अशी भुमिका भाजपाकडून घेतली जात आहे.

वांद्रे येथील ताज लँडस् एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये

एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांचा मुक्काम आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापना होईपर्यंत या नगरसेवकांना हॉटेलमध्येच ठेवले जाणार आहे. राज्यातील सत्तास्थापनेवेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाने सुरतमार्गे गुवाहाटी आणि गोवामार्गे महाराष्ट्रात येथ राज्यात उद्धव ठाकरेंची सत्ता उलटवली होती. या घटनेला यानिमित्त पुन्हा उजाळा मिळाला आहे.

शिंदे गटाच्या या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केल्याची माहिती आहे. आमच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नाही, असे या नगरसेवकांनी सांगितल्याचे समजते

आकड्यांची अडचण !.

मुंबई महापालिकेत सध्या भाजप नंबर एकचा पक्ष असून त्यांचे ८९ नगरसेवक निवडूण आले आहेत. युतीतील त्यांचा सहकारी पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे २९ नगरसेवक आहेत. दोघांकडे मिळून ११८ नगरसेवक महायुतीचे आहेत. बहुमतापेक्षा महायुतीकडे फक्त ४ नगरसेवक जास्त आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ६५ आणि युतीतील त्यांचे सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे ६ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे २ असे एकू ७३ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपाला मुंबईत महापौर करण्यासाठी शिंदेंच्या मदतीची नितांत गरजेची आहे. कारण एमआयएमचे ८ आणि समाजवादी पार्टीचे २ असे १० नगरसेवक मुस्लिम असल्यामुळे हा तिढा कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *