स्वित्झर्लंडमध्ये फडणविसांचे मराठमोळे स्वागत…

स्वित्झर्लंडमधिल वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी दावोसमध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क स्वित्झर्लंड महाराष्ट्र मंडळाने विमानतळावर मराठ मोळ्या पद्धतीन लेझिमने स्वागत केले.

 

फडणवीसांनी दावोसही ‘जिंकले’!

महाराष्ट्रात १५ लाख ७५ कोटींची गुंतवणूक ० १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होणार

दोवोस : स्वित्झर्लंडमधिल दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चातुर्याने दावोसही जिंकले. महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी व्यक्त केला. तसेच दावोस मधील इकॉनॉमी फोरममध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले.

दावोस मध्ये गुंतवणूकीचे ५४ आणि धोरणात्मक सहकार्याचे ७ असे एकूण ६१ सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र  आता डेटा सेंटरचे कॅपिटल होईल. डेटा हे नव्या युगाचे ‘ऑईल’ आहे. त्यामुळे या क्षेत्राची वाढ वेगाने होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. स्वित्झर्लंडमधील दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पत्रकारांशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई येथून सहभागी झाले.

सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन केले. तसेच दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमीक फोरममध्ये देशातील अन्य सहा राज्यांसमवेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दावोसमध्ये यावेळी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विश्वास निर्माण झाल्याचा बदल लक्षात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *