आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा
कल्याण: आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याकारणाने साळवे यांनी आपले आंदोलन तिव्र करून आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मला महाराष्ट्र शासन गृह विभागाचे उप सचिव यमुना जाधव यांनी साळवे यांना बोलवून अडचण ऐकून घेत ठाणे पोलीस आयुक्त यांना कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. परंतु त्या पत्रावर अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने नोवेल साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी नोवेल साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्यांचे ओपन हार्ट सर्जरी झाली होती. नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेल्या दिवसांपासून साळवे यांनी आझाद मैदानावर न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले होते व त्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली की त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून दोषींना वाचविणारे उल्हासनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे परंतु आजपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार पक्ष देखील याकडे लक्ष देत नसल्याने त्यामुळे 28 जानेवारी रोजी साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
