जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द येथील क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले भवन येथे ४४ व्या मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिनानिमित्त क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांच्या हस्ते जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मातंग समाजाचे नेते समाजभूषण सुदाम आवाडे, बी जी गायकवाड, मदन आवाडे, योगेश शिंदे,बंडु चांदणे, तुलसिराम ताटे, नितिन हिवाळे, हरीभाऊ कांबळे, दत्तात्रय आवाडे, रवी थोरात, पार्वती  आवाडे, अश्विनी शिंदे, द्वारकाबाई लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *