मुंबई : मुंबई महानगर पालिकेत सगळी गणित जुळली आणि नशिबाने साथ दिली तर मुंबईच्या  महापौरपदावर ठाकरे विराजमान होऊ शकातात… मुंबई महानगरपालिका निवडणूकीचा निकाल असा लागला आहे की कोणत्याच पक्षाला स्वबळावर महापौर करता येणार नाही. त्यात एकनाथ शिंदे यांनी आपले नगरसेवक हॉटेलवर ठेवल्यामुळे राजकारणात व्टिस्ट आला आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचाच महपौर व्हावा असा नॅरेटिव्ह सेट करण्यात शिंदेंची आणि ठाकरेंची सेना यशस्वी झालेत. आणि त्यामुळेच भाजपाला आस्तेकदमची भुमिका घ्यावी लागली आहे.

मुंबई मनपाच्या निकालात ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील एकनाथ शिंदेंची शिवसेना २९ जागांसह तिसऱ्या स्थानावर गेली आहे. सध्या सर्व पक्षिय नेते आपआपल्या पक्षातील नगरसेवकांना सांभाळण्यात गुंतले आहेत.
अशावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर “देवाची इच्छा असेल तर महापौर आपला असेल” असं वक्तव्य केलं होतं. हा ‘देव’ म्हणजे महापौर आरक्षण सोडत जाहीर झालेली सोडत. त्यामुळे महापौर आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मोठी उलथापालथ होऊ शकते.
येत्या २२ जानेवारीला महापौर आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. आजच याबाबतची माहिती नगरविकास मंत्रालयाने दिली. सर्व २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची  २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे. त्यावेळी कोणत्या प्रवर्गाचा महापौर मुंबईच्या खुर्चीत विराजमान होणार हे ठरणार आहे.

 महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी सध्याच्या घडीला ठाकरेंकडे दोन हुकूमाचे एक्के असल्याचं चित्र आहे. कारण निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये जागा अनुसूचित जमाती अर्थात ST साठी राखीव आहेत. प्रभाग ५३ आणि प्रभाग १२१ हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन मतदारसंघात सर्वपक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले. अशा परिस्थितीत जर २२ जानेवारीला महापौरपदासाठी जी आरक्षण सोडत निघणार आहेत्यावेळी महापौरपद जर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जाहीर झालं तर ठाकरेंना लॉटरी लागू शकते.
त्यामुळे जसं उद्धव ठाकरे म्हणालेत्याप्रमाणे जर “देवाची इच्छा असेल तर महापौर ठाकरेंचा होऊ शकतो.
प्रभाग ५३ आणि प्रभाग १२१ या दोन्ही प्रभागात ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग ५३ मधून जितेंद्र वळवी यांनी बाजी मारलीत्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचे अशोक खांडवेंचा पराभव केला. तर प्रभाग १२१ मधून प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला.  प्रियदर्शनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या उदमेवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केलाय. जन्मशताब्दी वर्षात ठाकरे आडनावाचा नगरसेवक मुंबईच्या महापौरपदावर विराजमान झाल्यास नियतिचे एक वर्तुळ पुर्ण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *