श्री मावळी मंडळ खो-खो स्पर्धा
रा.फ.नाईक,शिर्सेकर महात्मा गांधी अकादमी विजेते
ठाणे: येथील श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या विभागीय खो-खो स्पर्धेत महिला गटात रा. फ. नाईक महिला खो-खो संघ व पुरुष गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमीने विजेतेपदाचा मान मिळवला. महिला गटात ज्ञानविकास फॉउंडेशन स्पोर्ट्स क्लब (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा मंडळ (ठाणे) या संघानी उपविजेतेपद पटकावले.
महिला गटातील अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या रा. फ. नाईक महिला खो-खो संघाने ठाण्याच्या ज्ञानविकास स्पोर्ट्स फॉउंडेशन संघावर १०-०९ असा १ गुण व ०:०३ सेकंद राखून विजय मिळविला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाकडे ०५-०५ असे समसमान गुण होते. रा. फ. नाईक महिला खो-खो संघाच्या वैष्णवी जाधव (२:०० मि. व १ गुण, २:०० मि. व २ गुण), प्रणिती जगदाळे (१:१० मि. व १ गुण, १:४० मि.), पूजा फरगडे (३:१० मि., १ गुण), साक्षी तोरणे (२:०० मि., १:०० मि.) व गीतांजली नरसाळे (०:२० मि., ०४:०० मि.) यांनी संघाला विजय मिळवून देण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले. पराभूत संघाकडून धनश्री कंक (२:३० मि., २:१० ० व ३ गुण), तेजस्वी पोखरकर (२:१० मि. व १ गुण, २:२० मि. व १ गुण), रोशनी जुनघरे (२:१० मि, १:३० मि.) व प्राची वांगडे (१:३० मि. व १ गुण, ०:४० मि.) यांनी चांगला खेळ करीत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
पुरुष गटातील अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी संघाने ठाण्याच्या विहंग क्रीडा केंद्र संघावर १६-११ असा सहज ५ गुणांनी विजय मिळविला. मध्यंतरापर्यंत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघाने आक्रमक खेळ करीत ०९-०४ अशी ०५ गुणांची आघाडी घेतली. शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघाच्या धीरज भावे (२:१० मि. व १ गुण, १:४० मि.), अनिकेत पोटे (१:३० मि. व १ गुण, १:२० मि. व २ गुण), प्रतीक देवरे (१:३० मि. व २ गुण, ०:५० मि.), रामचंद्र झोरे (०२:०० मि. व १ गुण, ०:१० मि.) व निहार दुबळे (२ गुण, १ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पराभूत संघाकडून आकाश तोगरे (१:१० मि. व १ गुण, २:२० मि.), आदित्य कांबळे (१:४० मि. व १ गुण), सागर मोहंडकर (१:१० मि., ०:४० मि.) व वैभव मोरे (१:३० मि., ०:३० मि. व २ गुण) यांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरणाचा समारंभ प्रमुख पाहुणे सुधीर कोकाटे (नगरसेवक – शिवसेना), संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मनीष मुंदडा, चिटणीस. रमण गोरे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विशवस्त. केशव मुकणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्पर्धेतील पारितोषिके:
महिला गट: उदयोन्मुख खेळाडू: गुड्डी राठोड (शिवभक्त स्पोर्ट्स क्लब ठाणे)
उत्कुष्ट संरक्षक: गीतांजली नरसाळे (रा. फ. नाईक महिला खो-खो संघ ठाणे)
उत्कुष्ट आक्रमक: धनश्री कंक श्वेता जाधव (ज्ञानविकास स्पोर्ट्स फॉउंडेशन ठाणे)
अष्टपैलू खेळाडू: वैष्णवी जाधव (रा. फ. नाईक महिला खो-खो संघ ठाणे)
पुरुष गट: उदयोन्मुख खेळाडू: शुभम ढगळे (युवक क्रीडा केंद्र ठाणे)
उत्कुष्ट संरक्षक: लक्ष्मण गवस (विहंग क्रीडा केंद्र ठाणे)
उत्कृष्ट आक्रमक: निहार दुबळे (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई उपनगर)
अष्टपैलू खेळाडू: धीरज भावे (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई उपनगर)
