यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
अनिल ठाणेकर
मुंबई : मुंबई विभागीय केंद्रांतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे!!! माननीय कुलगुरू महोदयांच्या आदेशानुसार ८ फेब्रुवारीला श्री बापूसाहेब विसपुते बी.एड. कॉलेज, पनवेल येथेयुवा शक्ती फाउंडेशन आणि श्री डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी वरील लिंकवर आपली नोंदणी करून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व उत्कृष्ट रोजगाराची संधी मिळवावी, असे आवाहन मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. वामन नाखले यांनी केले आहे.सर्व केंद्रप्रतिनिधींना विनंती करण्यात येते की, कृपया ही माहिती सर्वत्र पोहोचवावी. या रोजगार मेळाव्यास केवळ मुक्त विद्यापीठाचेच नव्हे, तर इतर विद्यापीठांतील विद्यार्थीही नोंदणी करू शकतात.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यास नोंदणी करावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक(YCMOU) तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९७०७९६५७४२,८८७९33८८33

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *